गडचिरोलीतल्या 22 मतदान केंद्रांवर गुरुवारी फेरमतदान

October 14, 2009 10:07 AM0 commentsViews: 2

14 ऑक्टोबर गडचिरोली जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागात असलेल्या 22 मतदान केंद्रांवर फेरमतदान होणार आहे. मंगळवारी नक्षल्यांच्या हिंसक कारवायांमुळे या केंद्रांवर मतदान होऊ शकलं नव्हतं. यामध्ये गडचिरोलीतील 2, अहेरीतील 13 आणि आरमोरीतल्या 7 मतदान केंद्रांचा समावेश आहे. नक्षलवाद्यांच्या कारवाया लक्षात घेता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

close