प्रचारसभांचा धुराळा, सुपर विकेंडला दिग्गज उतरले आखाड्यात

April 18, 2015 2:41 PM0 commentsViews:

 

cm uddhav and pawar18 एप्रिल : नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचलाय. आज निवडणुकीचा शेवटचा आठवडा असल्यामुळे प्रचार सभांचा धुराळा उडत आहे. शनिवार आणि रविवार अशा दोन सुट्‌ट्या सलग लागून आल्यामुळे प्रचारासाठी सर्वच पक्षांच्या स्टार आणि दिग्गज नेत्यांनी मैदानात उडी घेतलीये. सर्वच पक्षांच्या पक्षप्रमुखांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महसूलमंत्री एकनाथ खडसे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सभा होणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले असून महापालिकांचा आखाडा आता चांगलाच तापलाय.

नवी मुंबईत राष्ट्रवादीची प्रतिष्ठापणाला लागल्यामुळे खुद्द शरद पवार सभा घेत आहे. तर औरंगाबादमध्ये युतीच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री सभा घेणार आहे. तसंच संध्याकाळी होणारी ओवेसी बंधूंची सभा खास आकर्षण ठरणार आहे. विशेष म्हणजे, भाजप आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष औरंगाबादेत तळ ठोकून आहेत. शनिवारी – रविवारी मिळून एकट्या औरंगाबादेत प्रमुख नेत्यांच्या 12 सभा होणार आहे.त्यामुळे दोन्ही शहरांमध्ये सभांचा चांगलाच फड रंगलाय.

नवी मुंबईत आज कुणाच्या सभा कुठे?

1. अशोक चव्हाण
 वेळ – दु. 12 वा.
 स्थळ – विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी

2. उद्धव ठाकरे आणि रावसाहेब दानवे
 वेळ – संध्या. 6 वा.
 स्थळ – ज्ञानविकास हायस्कूल, कोपरखैरणे

रविवारी कुणाच्या सभा कुठे?

1. देवेंद्र फडणवीस
 वेळ – संध्या. 6 वा.
 स्थळ – तांडेल मैदान, नेरुळ

2. शरद पवार
 वेळ – संध्या. 6 वा.
 स्थळ – तेरणा कॉलेज मैदान, नेरुळ

औरंगाबादेत आज कुणाच्या सभा कुठे?

1. देवेंद्र फडणवीस
 वेळ – संध्या. 7 वा.
 स्थळ – शिवाजीनगर

3. रावसाहेब दानवे
 वेळ – दु. 12 वा.
 स्थळ – जवाहर कॉलनी

4. एकनाथ खडसे
 वेळ – दु. 3 वा.
 स्थळ – श्रीकृष्ण नगर

5. अकरुबद्दीन आणि असादुद्दीन औवेसी
 वेळ – संध्या. 6 वा.
 स्थळ – आमखास मैदान

6. धनंजय मुंडे
 वेळ – दु. 2 वा.
 स्थळ – सिडको

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close