चिट्ठी काढून दिला जातोय शाळेत प्रवेश

April 18, 2015 4:01 PM0 commentsViews:

nursery_school18 एप्रिल : ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरातल्या अरुणोदय पब्लिक स्कुलने शाळेच्या ऍडमिशनसाठी एक नवा पायंडा पाडलाय. विद्यार्थ्यांचे ऍडमिशन हे पारदर्शकपणे व्हावे म्हणून चिट्ठी काढून या शाळेत ऍडमिशन दिला जातोय.

मर्यादित जागा आणि मोठ्या प्रमाणात आलेले फॉर्म्स यांच्यावर तोडगा काढण्यासाठी शाळेच्या प्रशासनाने हा पर्याय निवडलाय. अंध विद्या पाल्याच्या नावाची चिट्ठी काढल्यावर त्याचे ऍडमिशन नक्की झालंय. या पारदर्शकतेमुळे पालकांमधील रोष कमी होतोच त्याशिवाय योग्य पद्धतीने सर्वाना समान संधी मिळतेय. कोणत्याही प्रकार व्यवस्थापनाच्या देखील जागा या शाळेत शिल्लक ठेवण्यात येत नाही. त्यामुळे पालकांनी या पद्धतीचं स्वागत केलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close