मनसेचे उमेदवार राम कदम यांना अटक

October 14, 2009 10:12 AM0 commentsViews: 76

14 ऑक्टोबर मनसेचे घाटकोपरमधले उमेदवार राम कदम यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांशी बाचाबाची केल्याप्रकरणी त्यांना ही अटक झाली. मंगळवारी घाटकोपर पश्चिम मतदारसंघात तीन मतपेट्या निवडणूक अधिकार्‍यांनी परस्पर बाहेर काढल्या. मनसेचे उमेदवार राम कदम यांनी निवडणूक अधिकार्‍यांना धारेवर धरलं, पण निवडणूक अधिकार्‍यांना यावर उत्तर देता आलं नाही. त्यावेळी मनसे आणि पोलिसांत बाचाबाची झाली होती. त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान कदम यांनी विक्रोळी कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

close