मोदी सरकारने शेतकर्‍यांची दिशाभूल केली – सोनिया गांधी

April 19, 2015 2:25 PM0 commentsViews:

767sonia_gandhi
‘सबका साथ सबका विकास’ची घोषणा करून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने भूसंपादन विधेयकातून शेतकरी हिताचे मुद्दे वगळून शेतकर्‍यांची दिशाभूल केली आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर केला. रामलीला मैदानावर आयोजित किसान मजदूर रॅलीत सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. मोदी सरकारने खोटी आश्वासनं दिली, शेतकर्‍यांवर खूप अन्याय केला, पण ‘आता बस’ हाच संदेश देण्यासाठी आज आपण एकत्र आलो असल्याचं सोनियांनी म्हटले आहे.

आम्ही जरी सत्तेबाहेर असलो तरी शेतकर्‍यांसाठीच्या लढ्यामध्ये कोणतीही कमतरता येणार नाही, असं सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. भूसंपादन कायद्यातील बदलांविरोधात आम्ही 14 पक्षांना सोबत घेऊन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना विनंती केली. यापुढेही काँग्रेस शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. देशात अवकाळी आणि गारपीटीच्या तडाख्याने शेतकरी उद्धवस्त झाला आहे. दिवसेंदिवस आत्महत्या वाढत असताना नुकसान भरपाई देण्याऐवजी मोदी सरकार शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत असल्याची जळजळीत टीकाही गांधी यांनी यावेळी केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close