सिताराम येचुरी यांची ‘सीपीएम’च्या सरचिटणीसपदी निवड

April 19, 2015 3:29 PM0 commentsViews:

cpm-hopes-to-win-one-seat-in-assam-says-sitaram-yechury_29031404560719 एप्रिल : सिताराम येचुरी यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीएम) सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशाखापट्टणम इथे सुरू असलेल्या पक्षाच्या अखिल भारतीय अधिवेशानाच्या सांगता समारंभात येचुरी यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.

पक्षाचे ज्येष्ठ नेते रामचंद्रन पिल्लई आणि येचुरी यांच्यात सरचिणीसपदासाठी चुरस होती. मात्र, पिल्लई यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर येचुरी यांची सरचिटणीपदी नियुक्ती करण्यात आली. येचुरी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत.

येचुरींनी 1974 साली  Students federation of India मध्ये काम सुरू केलं.ते सध्या सीपीएमच्या संसदीय गटाचे अध्यक्ष आहेत. 2005 सालपासून ते राज्यसभेचे खासदार आहेत. तसंच, देशातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे मैत्रिपूर्ण संबंध आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close