भूमध्य समुद्रात जहाज बुडालं, 700 जणांचा मृत्यू झाल्याची भीती

April 19, 2015 4:34 PM0 commentsViews:

Libya

19 एप्रिल : भूमध्य सागरात लिबियाच्या किनारपट्टीजवळ एक जहाज बुडून झालेल्या दुर्घटनेत सुमारे 700 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त जात आहे. इटली, माल्टा या देशांनी; तसंच या भागामधील काही मोठ्या व्यापारी जहाजांनी इथे एकत्रितरित्या मदतकार्य सुरू केलं आहे

भूमध्य सागरात इटलीच्या दक्षिणेकडील लॅम्पडुसा बेटापासून 193 किमी अंतरावर लिबियाच्या हद्दीत प्रवाशांनी खचाखच भरलेलं एक जहाज काल (शनिवारी) रात्री बुडाले. या जहाजतमध्ये बहुंताश आफ्रिकेतील स्थलांतरीत नागरीकांचा समावेश आहे. या जहाजातील फक्त 28 प्रवाशांची सुटका करण्यात यश आलं आहे. या अपघातात सुमारे 700 जणांचा मृत्यू झाल्याची भीती संयुक्त राष्ट्राने वर्तविली असून, मृतांचा नेमका आकडा स्पष्ट झाल्यास हा दशकातील सर्वात मोठा अपघात ठरु शकतो असं म्हणण्यात येत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close