नवी मुंबई, औरंगाबाद महापालिका निवडणूक प्रचाराचा सुपर संडे

April 19, 2015 11:55 AM0 commentsViews:

akhada

19 एप्रिल : नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकेच्या प्रचाराचा आज शेवटचा रविवार असल्यामुळे सर्वच पक्ष प्रचारासाठी शक्ती पणाली लावली आहेत. सोमवारी संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्याने आज, दिवसभर दिग्गज नेत्यांच्या सभा गाजतील. रविवार असल्याने नोकरदार आणि चाकरमान्यांना घरीच हेरुन उमेदवार प्रचार करतील.

नवी मुंबईच्या नेरुळ इथे उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर सभा घेणार आहेत. तर औरंगाबादेतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होईल. त्यामुळे खर्‍या अर्थाने आज नवी मुंबई आणि औरंगाबादमध्ये निवडणूक प्रचाराचा सुपर संडे असेल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close