2011च्या क्रिकेट वर्ल्डकपचा कार्यक्रम जाहीर

October 14, 2009 12:49 PM0 commentsViews: 1

14 ऑक्टोबर 2011 मध्ये भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात क्रिकेट वर्ल्डकप होणार आहे. या वर्ल्डकपच्या 29 मॅच भारतात होणार आहेत. भारतातल्या मॅचचा कार्यक्रम बुधवारी जाहीर करण्यात आला. वर्ल्डकपची फायनल मुंबईत खेळवली जाणार आहे. फायनलसह आणखी दोन लीग मॅच मुंबईत होणार आहेत. मोहालीत एका सेमी फायनलसह दोन लीग मॅच होणार आहेत. तर एक क्वार्टर फायनल अहमदाबाद इथे होणार आहे. अहमदाबादमध्ये दोन लीग मॅचही खेळवण्यात येतील. त्याशिवाय दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरु आणि कानपूर इथेही प्रत्येकी चार लीग मॅच होणार आहेत.

close