चॅम्पियन्स लीगमध्ये पहिल्या सहा टीम्स निश्चित

October 14, 2009 1:29 PM0 commentsViews:

14 ऑक्टोबर चॅम्पियन्स लीगमध्ये आता सुपर एटचं चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. पहिल्या सहा टीम्स निश्चित झाल्यात. उरलेल्या दोन टीम्स येत्या दोन दिवसांत ठरतील. बुधवारी डेक्कन चार्जर्स आणि त्रिनिदाद अँड टोबॅको या टीम्सदरम्यानची मॅच रंगणार आहे. सुपर एटमध्ये पोहोचण्यासाठी डेक्कनला ही मॅच जिंकणं गरजेचं आहे तर त्रिनिदाद टीम रनरेटमध्ये डेक्कनपेक्षा वरचढ आहे. त्यामुळे त्यांना सुपर 8 ची फारशी काळजी नाही. बुधवारच्या मॅचमध्ये डेक्कनची ताकद आहे ती बॅटिंगमध्ये. ऍडम गिलख्रिस्ट, व्हीव्हीएस लक्ष्मण, रोहित शर्मा असे टी-20मधले यशस्वी बॅट्समन त्यांच्याकडे आहेत. याउलट त्रिनिदाद टीमचा भरवसा आहे तो ड्वेन आणि डेरेन या ब्राव्हो बंधूंवर. हैदराबादमध्ये बुधवारी रात्री आठ वाजता ही मॅच होणार आहे.

close