जैतापूर अणुप्रकल्प होणारच – मुख्यमंत्री

April 19, 2015 8:09 PM0 commentsViews:

19 एप्रिल : जैतापूर अणू प्रकल्पाबाबत आता मागे हटता येणार नसून कोणत्याही परिस्थितीत जैतापूर प्रकल्प होणारच असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेचा या प्रकल्पाला विरोध असतानाही भाजपा या प्रकल्पावर ठाम असल्याने सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेतील धूसफूस वाढण्याची दाट शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर्मनीच्या दौर्‍यावर गेले होते. या दौर्‍याहून आल्यानंतर त्यांनी IBN लोकमतला खास मुलाखत दिली आहे. ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर ‘मेक इन महाराष्ट्र’हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. त्यात परदेशी गुंतवणुकीमध्ये ग्रामीण महाराष्ट्राला प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली यावेळी दिली आहे. तसंच जैतापूर बाबत मोदींनी राजधर्माचे पालन केलं असल्याचं सांगत त्यांनी जैतापूर प्रकल्प होणारच असं म्हटलं आहे.

काश्मिरी पंडितांच्या मुद्यावर आम्हाला कुणीही हिंदुत्व शिकवायची गरज नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला लगावला आहे. या देशात राहणार्‌याला मतदानाचा अधिकार आहेच, अल्पसंख्यांकाना मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय त्यांचा विकास होणार नाही ही आमची भूमिका होती आणि आहे, असंही ते म्हणाले. औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीची सरकार स्पष्ट बहुमताने जिंकूर येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close