‘सामना’ चित्रपटाची 40 वर्षं

April 19, 2015 8:22 PM0 commentsViews:

19 एप्रिल : ग्रामीण भागातल्या राजकारणावर आधारित असलेला ‘सामना’ हा चित्रपट म्हणजे मराठी चित्रपटातील मानदंड… यावर्षी या सिनेमाला चाळीस वर्षं पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच्या काळात देशात आणीबाणी लागू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात एक कार्यक्रम पार पडला.  आणीबाणीतलं स्फोटक वातावरण काळाच्या पुढे जाऊन टिपणारा हा सिनेमा आहे, असं मत या चित्रपटाचे दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी व्यक्त केल. निळू फुले व श्रीराम लागू अशा दिग्गज अभिनेत्याच्या जोडगोळीने हा चित्रपट अजरामर केलाय असही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, पुण्यात पार पडलेल्या या कार्यक्रमात या महाराष्ट्राला निळूभाऊंची कदर करता आली नाही अशी खंत श्रीराम लागू यांनी व्यक्त केली. चित्रपटाला पहिल्या टप्प्यात तोटा सहन करावा लागला मात्र दुसर्‍या टप्प्यात चित्रपट लोकप्रिय ठरला. त्यावेळी कला शिक्षक असलेल्या रामदास फुटाणे यांनी सामनाच्या निर्मितीविषयी अनुभव सांगितले. यावेळी मोठ्या कौंग्रेस नेते उल्हास पवार उपस्थित होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close