लाहोरमध्ये दिवसभरात तीन हल्ले

October 15, 2009 9:36 AM0 commentsViews: 5

15 ऑक्टोबर लाहोर येथील FIA च्या कार्यालयावर गुरूवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. चार दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचं सांगण्यात येतंय. एकूण तीन ठिकाणी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. तर एका पोलिसाला आपला जीव गमवावा लागला. या दहशतवाद्यांनी काही पोलीस अधिकार्‍यांना ओलिस ठेवलं आहे. गेल्या पंधरा दिवसातला हा पाचवा दहशतवादी हल्ला आहे. यात 14 जण मृत्युमुखी पडलेत तर पाच जण जखमी आहेत. या मिशनमध्ये आतापर्यत दोन अतिरेकी ठार झाले. तेहरिक-ए-तालीबान या संघटनेनं या हल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

close