माझगाव डॉकमध्ये INS विशाखापट्टणमचं जलावतरण

April 20, 2015 1:48 PM0 commentsViews:

CDBNXFKVIAImyha20 एप्रिल : प्रोजेक्ट 15 बी, स्टेल्थ डिस्ट्रॉयर जातीची युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली आहे. ‘INS विशाखापट्टणम’ असं या युद्धनौकेचं नाव आहे. भारतीय बंदर आणि समुद्र किनार्‍याची रक्षणासाठी रुजू झालेल्या युद्धनौकेमुळे भारताच्या संरक्षण सज्जतेला आणखी बळ मिळणार आहे.

संपुर्णपणे भारतीय बनावटीची ही युद्धनौका स्टेल्थ गटातील आहे. स्टेल्थ फ्रिगेटस् युद्धनौका यापूर्वीच भारतीय नौदलात दाखल झाल्या आहेत. मात्र स्टेल्थ डिस्ट्रॉयरची भारतीय नौदलाला बर्‍याच वर्षांपासून प्रतीक्षा होती. स्टेल्थच्या विशेष गुणांमुळे या युद्धनौका शत्रुच्या रडारला चकवा देण्यात यशस्वी ठरतात. त्यामुळे ही युद्धनौका युद्धाच्यावेळी निर्णयाक भूमिका बजावू शकते.

मीटर लांब आणि 7500 टन वजनाची ही युद्धनौका नौदलाची सर्वात विध्वंसक युद्धनौका आहे. या युद्धनौकेचं सर्वात मोठ वैशिष्ट म्हणजे ब्रम्होस हे अत्याधूनिक मिसाईल या युद्धनौकेवर असणार आहेत. तसंच चार 30 mmच्या रॅपिड फायर गन या युद्धनौकेवर आहेत. यामध्ये 50 अधिकार्‍यांसह 300 जवान असणार आहे.

या युद्धनौकेचं आज जलावतरण झाल्यानंतर अत्याधूनिक शस्त्रास्त्रे आणि दूरसंचार यंत्रणा या युद्धनौकेवर ठेवण्यात येतील. त्यानंतर अनेक चाचण्यांनंतर ही युद्धनौका 2018 साली भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल होणार आहे. या प्रकराच्या चार युद्धनौका बनवण्यात येतील आणि त्यासाठी सुमारे 29 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close