महावितरणची वीज महागण्याची शक्यता

October 15, 2009 9:52 AM0 commentsViews: 7

15 ऑक्टोबर महावितरणच्या वीज बिलांमध्ये पुढच्या महिन्यापासून वाढ होण्याची शक्यता आहे. जवळपास वीज बिलात सात टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. महावितरणनं घरगुती वीज दरवाढीचा प्रस्ताव दिला होता. त्याला राज्यसरकारने स्थगिती दिली होती. पण राज्य वीज नियामक आयोगानं ही स्थगिती अमान्य केली. त्यामुळे येत्या महिन्यापासून वीज बिलात सात टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर, राज ठाकरेंनी घरगुती वीज दरवाढ आणि मॉल्स आणि मल्टिप्लेक्स वीजदर कमी करायला विरोध केला होता. त्यानंतर राज्य सरकारनं तातडीनं या प्रस्तावाला स्थिगिती दिली होती.

close