ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या वन डे सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा

October 15, 2009 10:33 AM0 commentsViews: 1

15 ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरिजसाठी, भारतीय टीमची घोषणा चेन्नईत करण्यात आली. ऑस्ट्रेलियाची टीम भारत दौर्‍यावर येत असून या दोन टीमदरम्यान सात वन डे मॅचची सीरिज खेळली जाणार आहे. या सीरिजसाठी गुरूवारी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताची कामगिरी लौकीकाला साजेशी झाली नव्हती. त्यामुळे या टीममध्ये काही बदल करण्यात आले आहेत. टीममध्ये काही नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. तर द वॉल राहुल द्रविडला टीममधून डच्चू देण्यात आला आहे. त्याच्याऐवजी सुदीप त्यागी पहिल्या दोन वन डेसाठी निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर भारताचा स्टार ओपनर वीरेंद्र सेहवागनं टीममध्ये कमबॅक केल आहे. दुखापतीमुळे सेहवाग गेल्या काही सीरिज खेळू शकला नव्हता. त्याचबरोबर युवराज सिंगनंही टीममध्ये आपली जागा पक्की केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान युवराजला दुखापत झाली होती. पण ऑस्ट्रेलिया सीरिजसाठी तो पूर्णपणे सज्ज असल्याचं सांगण्यात येत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानची पहिली वन डे येत्या 25 ऑक्टोबरला रंगणार आहे. ही सीरिज जिंकून आयसीसी क्रमवारीत पुन्हा एकदा नंबर वनचं स्थान गाठण्याची भारतीय टीमला संधी आहे.

close