महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या

April 20, 2015 5:23 PM0 commentsViews:

palika election20 एप्रिल : औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आता थंडावल्यात. आज सोमवारी पाच वाजता दोन्ही महापालिकेत प्रचाराची सांगता झाली. 22 एप्रिलला या दोन्ही महापालिकांसाठी मतदान होणार आहे.

आज कुठल्याही मोठ्या नेत्याची सभा झाल्या नाहीत. सर्व उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर दिला.दोन्ही ठिकाणी शिवसेना आणि भाजप एकत्रित लढतायेत, तर काँग्रेस-राष्ट्रवादी मात्र दोन्हीकडे स्वतंत्रपणे लढत आहे. महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्र्यांपासून ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांपर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी सभा घेतल्यात. औरंगाबादमध्ये एमआयएमही निवडणूक लढवतेय. त्यामुळे ओवैसी बंधुही प्रचारात स्वत: सहभागी झाले होते. या दोन्ही महापालिकांसाठी 22 एप्रिलला मतदान होणार असून 23 एप्रिलला मतमोजणी होणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close