भूसंपादन विधेयक शेतकर्‍यांच्याच हिताचं -गडकरी

April 20, 2015 6:19 PM0 commentsViews:

gadkari on land bill20 एप्रिल : केंद्र सरकारचं भूसंपादन विधेयक हे शेतकरी विरोधी नसून शेतकर्‍यांच्याच हिताचं आहे. यातून शेतकर्‍यांबरोबरच ग्रामीण भागाचाही अधिकाधिक विकास होईल असा दावा केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केलाय.

तसंच, विदर्भामध्ये शेतकर्‍यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललंय. आता शेतकर्‍यांनी पारंपारिक शेतीच्या पद्धतीत अडकून राहण्यापेक्षा आधुनिक शेतीकडे वळण्याची गरज आहे, आणि तसं झालं तरच शेती आणि शेतकरी दोघांचीही प्रगती होईल असा दावाही गडकरींनी केला.

नितीन गडकरींनी आयबीएन लोकमतला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. नितीन गडकरी यांची मुलाखत तुम्ही पाहु शकता आज रात्री 9 वाजता आयबीएन लोकमतवर

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close