सरकारची अशीही ‘आत्महत्या’, अवकाळीमुळे 3 शेतकर्‍यांच्याच आत्महत्या

April 20, 2015 7:34 PM0 commentsViews:

farmer suicide20 एप्रिल : दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, पुन्हा अवकाळी, पुन्हा गारपीट… अशा नैसर्गिक संकटांशी झगडणार्‍या शेतकर्‍यांना आता सुल्तानी संकटाला सामोरं जावं लागतंय. अवकाळी पावसानंतर महाराष्ट्रात फक्त 3 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यात असा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवून राज्य सरकारनं स्वतःचा असंवेदनशीलपणा दाखवून दिलाय. खुद्द केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी लोकसभेत ही माहिती दिली.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणलं. गारपिटीने नाशिक, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात शेतीचं प्रचंड नुकसान झालं. उभी पिकं हातची गेल्यामुळे शेतकरी हवालदील झाले. शेतीच्या नुकसान आणि कर्जबाजाला कंटाळून शेतकर्‍यांनी आपलं जिवन संपवलं. शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारने पॅकेज जाहीर केलं खरं, पण दुसरीकडे सरकारने शेतकर्‍यांचीच थट्टा उडवलीये. शेतकर्‍यांच्या आत्महत्याच्या मुद्द्यावर 8 राज्यांनी केंद्राला पत्र पाठवलंय. त्यापैकी महाराष्ट्र वगळता, इतर राज्यांनी आत्महत्या झाल्या नाहीत असं सांगितलं. तर राज्य सरकारने महाराष्ट्रात 3 आत्महत्या झाल्याची माहिती दिली. लोकसभेत शेतीच्या चर्चेवर उत्तर देताना कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी ही माहिती दिली. मात्र, हा अहवाल विश्वसनीय नाही, असं कृषीमंत्र्यांनीच सांगितल्यामुळे, राज्य सरकारची लाज गेलीये.

आयबीएन लोकमतचे सवाल
आत्महत्यांचा आकडा कमी दाखवून सरकार नेमकं काय सिद्ध करू पाहतंय ?
शेतकर्‍यांच्या आत्महत्यांबाबत सरकार असंवेदनशीलपणे का वागतंय ?
राज्यात फक्त 3 आत्महत्या दाखवून सरकार शेतकर्‍यांच्या दुःखावर मीठ का चोळतंय ?
चुकीची आकडेवारी देणार्‍या अधिकार्‍यांवर काय कारवाई होणार ?
चुकीची आकडेवारी दिल्याने केंद्राकडून मदत कशी मिळणार ?
अवकाळी पावसामुळे 3 महिन्यात फक्त 3 आत्महत्या हे राज्य सरकारचं अज्ञान आहे की बेफिकीरी ?

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close