सीएम साहेब, राज्यात 3 नव्हे 438 शेतकर्‍यांच्या आत्महत्या !

April 20, 2015 8:40 PM0 commentsViews:

farmmer20 एप्रिल : अस्मानी संकटाने हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांनी आपली जिवन यात्रा संपवली. पण,बळीराजाच्या बाबतीत सरकार किती संवेदनशील आहे याचं ताज उदाहरण आज लोकसभेत पाहण्यास मिळालं. अवकाळी पावसानंतर राज्यात फक्त 3 शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्यात असा अहवालाच राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला होता. मात्र, अवकाळी पावसानंतर राज्यात 3 नव्हे तर 438 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहे.

मात्र, सरकारला याचं सोयरसुतूक नाही. ज्या विदर्भातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले आहेत. त्यांच्याच विभागात 40 शेतकर्‍यांनी जिवन यात्रा संपवलीये. तर मराठवाड्यात 242 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे आणि हा सरकारचाच अधिकृत आकडा आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी भाजपने ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा’ अशी जाहिरातबाजी केली होती. आता त्याच जाहिरातीप्रमाणे ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?’ असा सवाल उपस्थित होत आहे.

राज्यात अवकाळीनंतर किती आत्महत्या झाल्यात ?

– अवकाळी पावसानंतर एकट्या यवतमाळ जिल्ह्यात 10 शेतकरी आत्महत्या झाल्यात
– तर विदर्भात 40 आत्महत्या झाल्यात
– मराठवाड्यात गेल्या तीन महिन्यात 242 शेतकरी आत्महत्या झाल्यात (अधिकृत आकडेवारी)
– बीडमध्ये सर्वात जास्त 67 आत्महत्या
– औरंगाबाद जिल्ह्यात 40 आत्महत्या
– उस्मानाबाद जिल्ह्यात 39 आत्महत्या

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close