लवकरच बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई हायकोर्ट नामांतरण !

April 20, 2015 11:48 PM0 commentsViews:

mumbai high court43420 एप्रिल : अखेर बॉम्बे हायकोर्टाचं नाव लवकरच बदलण्याची शक्यता आहे. आठवडाभरात हा निर्णय होऊ शकेल असे संकेत कायदामंत्री सदानंद गौडा यांनी दिले आहे.

14 ऑगस्ट 1862 साली अस्तित्वात आलेल्या बॉम्बे हायकोर्टाच्या अंतर्गत तीन औरंगाबाद, नागपूर आणि गोवा खंडपीठ येतात. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसोबत दिव-दमण आणि दादर आणि नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश मुंबई उच्च न्यायलयाच्या क्षेत्रात येतात.

हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात केवळ सुप्रीम कोर्टात दाद मागता येतेय. मद्रास आणि बॉम्बे हायकोर्टाच्या नामांतरण करण्यासाठी केंद्राने प्रयत्न सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता. आज पुन्हा बॉम्बेऐवजी मुंबई हायकोर्ट असं नामकरण करावं अशी मागणी शिवसेनेनं लोकसभेत केलीये. सेनेचे खासदार विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांनी ही मागणी केली. कायदा मंत्रालयानं ही मागणी मान्य केलीय. मात्र त्याला मंत्रिमंडळाची मान्यता घ्यावी लागेल, असं पत्र कायदामंत्री सदानंद गौडा यांनी खासदारांना पाठवलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close