म्हाडाच्या घरवाटपावरची स्थगिती हायकोर्टाने उठवली

October 15, 2009 12:15 PM0 commentsViews: 1

15 ऑक्टोबर म्हाडाच्या घर वाटपांवरची स्थगिती हायकोर्टाने उठवली आहे. ऑनलाईन लॉटरीसाठी वापरलेल्या सॉफ्टवेअरमध्ये घोळ झाल्याप्रकरणी म्हाडाविरुद्ध मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरची सुनावणी मात्र सुरूच राहणार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय. म्हाडाने यावर्षी मुंबईत 3863 घरांसाठी ऑनलाईन लॉटरी काढली होती. त्यात गैरप्रकार झाल्याची तक्रार होती. ही स्थगिती मागे घेण्यासाठी म्हाडाने यापुढे गैरप्रकार होणार नाहीत असं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. त्याप्रमाणे बुधवारी म्हाडाने हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलं होत.

close