सलमानचा फैसला 6 मे रोजी ; दोषी आढळल्यास 10 वर्ष तुरूंगवास ?

April 21, 2015 1:15 PM0 commentsViews:

Hit and run salman21 एप्रिल : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान फुटपाथ अपघात प्रकरणाचा अंतिम निकाल 6 मे रोजी घोषित करण्यात येणार आहे.या प्रकरणाचा खटला मुंबई सेशन्स कोर्टात सुरू आहे. आज कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद जाणून घेऊन अंतिम निकाल 6 मे रोजी घोषित करणार असल्याचं स्पष्ट केलं.

28 सप्टेंबर 2002 साली सलमान खानने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात गाडी चालवून फुटपाथवर पाच जणांना चिरडलं होतं. या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता तर इतर चौघे जबर जखमी झाले होते. गेली 13 वर्ष या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू होती. अखेरीस या प्रकरणी दोन्ही पक्षांनी आपला युक्तीवाद सादर केला. सलमान खानच्या वकिलांनी सलमान गाडी चालवत नव्हता, गाडी उचलण्याच्या क्रेनचा धक्का लागून एकाचा मृत्यू झाला असा युक्तीवाद केला. तसंच या प्रकरणी सर्व साक्षीदारांची उलट तपासणीही करण्यात आली. तसंच ओळख परेडही घेण्यात आली. सर्व साक्षीदारांनी सलमानची ओळख पटवली आहे. तर वैद्यकीय अहवालात सलमानच्या अल्कोहल टेस्टमध्ये सलमान नशेत होता. अल्कोहलची मात्र मर्यादेपेक्षा जास्त होती असंही आढळून आलंय. सलमानविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. जर सलमान खान या प्रकरणात दोषी आढळला तर त्याला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close