नवी मुंबई आणि औरंगाबादेत मतदानांसाठी जय्यत तयारी

April 21, 2015 3:38 PM0 commentsViews:

palika election21 एप्रिल : नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू आहे. नवी मुंबईत 774 मतदान केंद्रांवर 4500 कर्मचारी नेमण्यात आले आहेत. सी. सी. टीव्हीही बसवण्यात आलेत. 20 भरारी पथकही तैनात करण्यात आली आहे. पोलिंग मशीन्स आज संध्याकाळ पर्यंत मतदान केंद्रावर रवाना होणार आहेत.

नवी मुंबई कायदा व्यवस्था सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आलाय. मतदान केंद्रांवर 200 पोलीस अधिकार्‍यांसह 2500 पोलीस कर्मचारी तैनात आहेत. तसंच एसआरपीएफ तीन कंपन्याही तैनात असतील. मतदारांनी निर्भयपणे मतदान करावं, असं आवाहन पोलीस उपायुक्त शाहजी उमाप यांनी केलंय.

तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये उद्या होणार्‍या महापालिका मतदानाची तयारी प्रशासनानं केलीय. आज सकाळपासूनच कर्मचार्‍यांना मतदान यंत्र देण्यात आली. उद्याच्या मतदानात व्यत्यय येऊ नये म्हणून प्रत्येक कर्मचार्‍याला प्रशिक्षणही देण्यात आलंय. 113 जागांसाठी 907 उमेदवार आपलं नशिब आजमावत आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close