आळंदीमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुखांवर सशस्त्र हल्ला

April 21, 2015 6:34 PM0 commentsViews:

ram gavande21 एप्रिल : पुणे जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी सशस्त्र हल्ला केल्याची घटना घडली आहे या हल्यात गावडे यांच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

पुण्याजवळील आळंदी येथील मरकळ रोडवर दुपारी दोनच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. व्यावसायिक पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असावा,असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, गावडे यांच्यावर झालेला हल्ला हा राजकीय वादातून झाला असल्याचं सांगत शिवसेना आमदार सुरेश गोरे यांनी या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या खेड नगरपरिषदेसाठी निवडणूक होती आहे. त्याच निवडणुकीमध्ये लढणार्‍या विरोधकांनी हा हल्ला केल्याची शक्यता असल्याचं गोरे म्हणाले आहेत. या सर्व प्रकाराचा तपास आळंदी पोलीस तपास करीत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close