अरविंद केजरीवाल ‘हिटलर’, शांती भूषण यांचं टीकास्त्र

April 21, 2015 8:32 PM0 commentsViews:

shanti bhushan on ak21 एप्रिल : आम आदमी पक्षातून योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीये. प्रशांत भूषण यांचे वडील आणि आपचे सदस्य शांती भूषण यांनी केजरीवाल यांच्यावर सडकून टीका केली असून त्यांना हिटलर अशी उपमा दिलीये. अऱविंद केजरीवाल यांना ओळखण्यात आपण मोठी चुकी केलीये. केजरीवाल हिटलर सारखं काम करतायत अशी टीका शांती भूषण यांनी केलीये.

विशेष म्हणजे दिल्ली विधानसभा निवडणुकीत शांती भूषण यांनी भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्यापेक्षा उत्तम असल्याचं म्हटलं होतं. सत्तेवर विराजमान झाल्यानंतर आपमध्ये यादवी माजली होती. अखेरीस आपने सोमवारी रात्री योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी पक्षातून हकालपट्टी केलीये. त्यानंतर केजरीवाल यांच्याविरोधात पक्षातूनच तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close