गडचिरोलीत फेरमतदानादरम्यान 57 टक्के मतदान

October 15, 2009 1:03 PM0 commentsViews: 1

15 ऑक्टोबर नक्षलवाद्यांच्या छायेखाली असलेल्या गडचिरोलीतल्या मतदारांनी पुन्हा एकदा त्यांच्या दहशतीला झुगारून दिलं. 22 मतदान केंद्रांवर फेरमतदानात 57 टक्के मतदानाची नोंद झाली. मतदानात अडथळे आणण्याचे अनेक प्रयत्न नक्षलवाद्यांनी केले. नक्षलवाद्यांनी 2 ठिकाणी हल्लेही केले. यावेळी कोरची तहसील कार्यालयावर हल्ला तर एटापल्ली तालुक्यातील पोलीस कॅम्पवर हल्ला झाला. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांच्या भीतीमुळे काही ठिकाणची मतदान केंद्र दुसरीकडे हलवण्यात आली होती.मतदानासाठी कडेकोट सुरक्षा होती. 13 तारखेला या 22 केंद्रांवर मतदान होऊ शकलं नव्हतं, त्यामुळे या ठिकाणी पुन्हा मतदान घेण्यात आलं.

close