अणुऊर्जा प्रकल्पाला शेतकर्‍यांचा विरोध

October 16, 2009 9:18 AM0 commentsViews: 2

16 ऑक्टोबर शेतकर्‍यांच्या विरोधामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या केंद्र सरकारचा प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प अडचणीत आला आहे. भारत-अमेरिका अणुकरारानंतर देशातला पहिला प्रकल्प राजापूर तालुक्यातल्या माडबनमध्ये मंजूर झाला. या प्रकल्पासाठी माडबन, करेल या गावातली 938 हेक्टर जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या जमिनी द्यायला शेतकर्‍यांनी विरोध केला आहे. या जमिनीचा मोबदला घ्यायला गुरुवारी शेतकर्‍यांनी नकार दिला.

close