NSG च्या स्थापनेला 25 वर्षं पूर्ण

October 16, 2009 9:24 AM0 commentsViews: 1

16 ऑक्टोबर नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजेच NSG शुक्रवारी आपल्या स्थापनेचं रौप्यमहोत्सवी वर्ष साजरं करतंय. त्यानिमित्ताने हरियाणातल्या मानेसर इथल्या NSG च्या मुख्यालयात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मंुबई हल्ल्यात NSG च्या ब्लॅक कॅट कमांडोजनी मोठं शौर्य दाखवलं होतं. नरिमन हाऊसमधली अतिरेक्यांविरोधातली कारवाई तब्बल 49 तास चालली होती. त्यात NSG च्या एका कमांडोसह 8 परदेशी नागरिकांचा जीव गेला होता. त्यावेळच्या कारवाईचं प्रात्यक्षिक शुक्रवारी मानेसरमध्ये दाखवण्यात आलं. याप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी NSG च्या जवानांचं गौरव करणारं विशेष गाणं प्रसिद्ध केलं. प्रसिद्ध कवी गुलजार यांनी हे गाणं लिहिलं आहे. तर शंकर महादेवन यांनी हे गीत गायल आहे. चार मिनिटांचं हे गाणं आहे. NSG च्या ब्लॅक कमांडोजनी मुंबई हल्ल्यात अतिरेक्यांविरोधात कारवाई करताना मोठं शौर्य दाखवलं होतं. त्याची या गाण्यात प्रशंसा करण्यात आली आहे.

close