मुख्यमंत्र्यांचा निशाणा आघाडीवर मात्र, लागला गडकरींना ?

April 22, 2015 3:16 PM1 commentViews:

fadnvis meet gadkari22 एप्रिल : राज्य सरकारने अलीकडेच 12 टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला. पण, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरचा टोल रद्द करण्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर खापर फोडलं खरं,पण त्याचा नेम मात्र चुकला असून युती सरकारच्या काळात नितीन गडकरी यांनीच एक्स्प्रेस वे बांधला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा रोख कुणाकडे ?, असा प्रश्न उपस्थित झालाय.

पुण्यात वसंत व्याख्यानमालचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे टोलमाफीबद्दल भूमिका मांडली.मागच्या सरकारने कंत्राटदारांसोबत चुकीचे करार करून ठेवल्यामुळे एक्स्प्रेसवरची टोलवसुली रद्द करणं अशक्य असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

करारात राज्याच्या हिताचा विचार केला नाही. स्वहिताचा विचार केला गेला, असं रोखठोक मत मुख्यमंत्र्यांनी पुण्यात बोलताना व्यक्त केलंय आणि त्यामुळे टोलच्या बाबतीत पुन्हा एकदा टोलवाटोलवी सुरू झाल्याचं दिसून येतंय.

करारात बाय बॅकच नाही, राज्याच्या हिताचा विचार केला नाही. स्वहिताचा विचार केला. असे करार करतात जे पुढच्या पिढीला भोगावे लागतील असंही मुख्यमंत्री म्हणाले. मात्र,एक्स्प्रेस वे हा नितीन गडकरींच्या काळात बांधला गेलाय याचा मुख्यमंत्र्यांना विसर पडला. आता नितीन गडकरी मुख्यमंत्र्यांचा विधानाला उत्तर देता की मुख्यमंत्री सारवासारव करता हे पाहण्याचं ठरेल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • PRAKASH THAKURDESAI

    साहेब , जेव्हा टोल मुक्त महाराष्ट्र बोंबलत फिरत होतात तेंव्हा असे काही जर तर वा काही मर्यादा असतील असा सांगितला नव्हत!! तेंव्हा का नाही कलल हे ?

    लोकांना मुर्ख बनवता तुम्ही ….!!! तुम्हाला माहिती आहे का कि ऐरोली टोल नाका आणि ठाण्याचा आनंद नगर टोल नाका यातील अंतर किती आहे ते? ५ kM च्या या अंतरा साठी टोल का द्यायचा ??? तुमचा नियम काय आहे….२० KM चा अंतर हवा २ टोल नाक्या मध्ये, मग हे काय ?

    साहेब , आता तरी लोक-लज्जे खातर खर सांगा लोकांना कि आम्ही फेकतो आणि या टोल मध्ये आमची लागेबंध आहेत !!!!

close