राम कदम यांचा जामीन अर्ज मागे

October 16, 2009 9:25 AM0 commentsViews: 2

16 ऑक्टोबर मुंबईतल्या घाटकोपर पश्चिम मतदारसंघातले मनसेचे उमेदवार राम कदम यांनी जामीन आपला अर्ज मुंबई सेशन कोर्टातून मागे घेतला आहे. कोर्टाने त्यांना पुढची तारीख दिल्यामुळे त्यांनी हा अर्ज मागे घेतला. 13 ऑक्टोबरला मतदानाच्या दिवशी घाटकोपरमध्ये मतपेट्या मतदान केंद्राच्या बाहेर काढल्यामुळे, राम कदम यांनी पोलीसांशी बाचाबाची केली होती. त्यामुळे त्यांना चौदा तारखेला अटक करण्यात आली होती. राम कदम यांनी जामीन मीळवण्यासाठी कोर्टात अर्ज केला होता.

close