बेस्ट मध्ये 8 हजार जणांची भरती

October 16, 2009 9:27 AM0 commentsViews: 76

16 ऑक्टोबर बेस्ट एक हजार नव्या बसेसचा आपल्या ताफ्यात समावेश करणार आहे. त्यासाठी आठ हजार तरुणांना ड्रायव्हर आणि कंडक्टरचा रोजगार मिळेल. अशा प्रकारच्या भरतीला बेस्टनं मंजुरीही दिली आहे. तब्बल दहा वर्षानंतर पहिल्यांदाच अशी भरती होत आहे. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नगर पुनर्निर्माण मोहिमेअंतर्गत बेस्टमध्ये एक हजार बस दाखल होणार आहेत. निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर बेस्टमध्ये भरती सुरू होईल अशी माहिती बेस्टचे माजी अध्यक्ष संजय पोतनीस यांनी दिली.

close