काँग्रेसमध्ये निकालापूर्वीच मुख्यमंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी

October 16, 2009 9:29 AM0 commentsViews: 1

16 ऑक्टोबर विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि कृपाशंकरसिंग शुक्रवारी दिल्लीत दाखल झाले. ते पक्षश्रेष्ठींना भेटण्याची शक्यता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचंच सरकार सत्तेवर येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एक्झिट पोलचा कल आघाडीकडेच आहे. आघाडीला 135-145 जागा मिळतील, असा अंदाज गुप्तचर विभागानंही वर्तवला आहे. त्या रिपोर्टची सविस्तर माहिती चव्हाण आणि कृपाशंकर सिंह पक्षश्रेष्ठींना देतील. तसंच बंडखोरांचा पाठिंबा घेण्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. मतदानानंतर आता सगळ्याचं लक्ष लागलंय 22 तारखेच्या निकालाकडे.

close