नयना पुजारी खूनप्रकरणी तिघांनाअटक

October 16, 2009 12:48 PM0 commentsViews: 4

16 ऑक्टोबर पुण्यातल्या नयना पुजारी खूनप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी अजूनही फरार आहे. या आरोपींमध्ये कंपनीतून घरी घेऊन जाणार्‍या ड्रायव्हर आणि सिक्युरिटी गार्डचा समावेश आहे. या आरोपींनी नयना पुजारीच्या खुनाची कबुली दिली आहे. पुणे क्राईम ब्रँचनं या आरोपींना अटक केली आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणारी नयना पुजारी 7 ऑक्टोबरला बेपत्ता झाली होती. त्यानंतर 9 तारखेला तिचा मृतदेह खेड परिसरात सापडला होता. तिच्या पर्समधून ATM कार्ड चोरीला गेलं होतं. त्या कार्डावरुन 45 हजार रुपये काढून घेतल्याचं समजतं.

close