नाशिकमध्ये जबरी दरोडा, तब्बल 58 किलो सोनं लुटलं

April 24, 2015 3:34 PM0 commentsViews:

nashik robbery24 एप्रिल : आजपर्यंतचा हायवे वर सर्वात मोठा दरोडा टाकण्यात आलाय. नाशिकमध्ये कसारा मार्गावर दरोडेखोरांनी तब्बल 58 किलो सोनं लुटलंय. या सोन्याची बाजारभावाप्रमाणे अंदाजे साडेपंधरा कोटी इतकी किंमत आहे. या दरोड्यामुळे नाशकात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी ठिकठिकाणी नांकाबंदी केली असून दरोडेखोरांचा शोध घेत आहे.

झी गोल्ड कंपनीचं सोन मुंबईहून शिरपूर येथील रिफायनरीसाठी नेण्यात येत होतं. त्यावेळी नाशिकजवळील वाडीवरे इथे दरोडेखोरांनी पोलीस असल्याचं भासवून गाडी अडवली. बंदुकीचा धाक दाखवून 58 किलो किला सोनं लंपास केलं आणि दरोडेखोर पसार झाले. दरोडेखोर अंबर दिव्याच्या गाडीत आले होते. पोलिसांनी सर्वबाजूने तपास सुरू केला असून दरोडेखोरांना शोधण्यासाठी चार पथकं तयार करण्यात आली आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close