साहित्यिक उपाशी, महामंडळ तुपाशी !

April 24, 2015 4:35 PM0 commentsViews:

ghuman samelan24 एप्रिल : घुमान संमेलनाच सूप वाजलं असलं तरी त्याचं कवित्व अजून संपलेलं नाही . साहित्यिक उपाशी महामंडळ तुपाशी अशी अवस्था आहे. साहित्यिकांना केवळ एक हजार रुपये मानधन देण्यात आलंय, तर सांस्कृतिक कार्यक्रम केलेल्या सिनेकलावंताना तब्बल 25 हजार रुपये देण्यात आले आहे. महामंडळाचे कोषाध्यक्ष सुनील महाजनांशी संबंधित ‘पायलवृंद’ या संस्थेला दीड लाख रुपये देण्यात आलेत. तर कार्यक्रमाची संहिता लिहिली म्हणून साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य यांनाही 25 हजार रुपये देण्यात आलेत. यावर मोठी टीका होतेय.

साहित्यिक राजन खान यांनी खोचक प्रतिक्रिया देत साहित्यिकांनी सिनेकलावंत व्हावं असं म्हटलंय, तर पहिल्यांदा विवस्त्र करून नंतर महावस्त्र असं करू नका ,अशी जळजळीत प्रतिक्रिया माजी संमेलनाध्यक्ष द. भी कुलकर्णी यांनी दिली. साहित्यिकांचा योग्य सन्मान झाला पाहिजे. कलावंत व साहित्यिकांना समान मानधन मिळालं पाहिजे असं मत माजी कुलकर्णी यांनी व्यक्त केलंय. तर पायल वृंद संस्थेशी आर्थिक बाबीशी संबध नाही असं म्हणत सुनील महाजनांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. आपण पत्रकार परिषद घेऊन खुलासा करू अस महाजन यांनी स्पष्ट केलं. एकंदरीतच ज्ञानपीठकार भालचंद्र नेमाडे यांनी साहित्य संमेलनावर केलेली टीका म्हणजे वास्तव असल्याच समोर येतंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close