सलीम अली पक्षी अभयारण्य की डंपिंग ग्राऊंड ?

April 24, 2015 6:28 PM2 commentsViews:

हलिमा कुरेशी, पुणे

24 एप्रिल : पुण्याजवळ येरवड्यामध्ये सलीम अली पक्षी अभयारण्याची दुरवस्था झालीये. हे अभयारण्य आहे की कचरा डेपो असा प्रश्न पडावा इतक्या वाईट स्थितीमध्ये हे अभयारण्य आहे. या पक्षी अभयारण्याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट..

कचराकुंड्या, अस्ताव्यस्त पडलेला राडारोडा…पण हा कुठला कचरा डेपो नाहीये. तुमचा विश्वास बसणार नाही…पण हे आहे…पुण्यातल्या येरवडामधलं सलीम अली पक्षी अभयारण्य. अभयारण्यामध्ये आल्यावर खरंतर प्रसन्न वाटायला हवं पण इथल्या दुर्गंधीमुळे इथे आतही जाता येत नाहीये. इथं सुरक्षारक्षकही नाहीये. त्यामुळे हा तळीरामांचा अड्डा झालाय.

या परिसरात यायचं म्हटलं तर आसपासच्या परिसरात कुणाला अभयारण्याबद्दल माहिती नाही. बेसुमार वृक्षतोडीमुळे घनदाट असलेला 8 एकरचा परिसर धोक्यात आलाय. याबद्दल अभ्यासकांनी पुणे महापालिकेत तक्रारी नोंदवल्यात. पण कारवाई मात्र होत नाहीये.

पुणे महापालिकेने ही वनविभागाची जबाबदारी आहे, असं म्हटलंय पण, वनविभागाकडे अभयारण्याचा खर्च पेलण्याची ताकद नाही. अभयारण्याची काळजी महसूल विभागानं घ्यायची, वन विभागानं की महापालिकेनं या वादात हे अभयारण्य तसंच दुर्लक्षित राहिलंय. वृक्षतोडीवर कारवाई होतेय तीही मर्यादितच. वन विभागाच्या लक्षात ही गोष्ट आणून दिल्यावर आता इथं सुरक्षारक्षक नेमण्याचं वनविभागानं मान्य केलंय.

सलीम अली अभयारण्य जर असंच दुरिल्क्षित राहिलं तर इथे अतिक्रमणांचा धोका आहे. एकीकडे वनक्षेत्र कमी होतंय. असं असताना जे वनक्षेत्र अजूनही अस्तित्वात आहे. त्याची योग्य प्रकारे देखभाल केली जात नाहीये. इथली दुरवस्था पाहिल्यानंतर तरी महापालिका आणि वनविभाग या अभयारण्याकडे लक्ष देतील, अशी अपेक्षा !

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Aamir pathan

    problem is from last 2 years, any authorities person didnt take action.

  • Aamir pathan

    even mla or corporatiors

close