चंद्रपुरातले दोन वीजनिर्मिती संच बंद

October 16, 2009 12:51 PM0 commentsViews: 6

16 ऑक्टोबर चंद्रपुरमधल्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातले 500 मेगावॅटचे सुपर थर्मल पॉवरचे दोन संच बंद पडले आहेत. त्यामुळं 2 हजार 340 मेगावॅट क्षमता असलेल्या या वीजनिर्मिती केंद्रातून आता फक्त 1 हजार 96 मेगावॅटच वीजनिर्मिती सुरू आहे. 6 आणि 7 नंबरचे दोन संच गुरुवारी ट्युब लिकेजमुळे बंद पडले. या दोन्ही संचाच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. शनिवारी संध्याकाळपर्यंत हे दोन्ही संच सुरू होतील, असं वीजनिर्मिती केंद्राच्या महासंचालकांनी सांगितलं.

close