सुलेमान बेकरी हत्याकांड : रामदेव त्यागी निर्दोष

October 16, 2009 12:53 PM0 commentsViews: 5

16 ऑक्टोबर 1992 च्या दंगलीतल्या सुलेमान बेकरी हत्याकांडप्रकरणी एसीपी रामदेव त्यागी यांना हायकोर्टाने निर्दोष ठरवलं आहे. त्याआधी सेशन कोर्टानेही त्यागींसह 9 जणांना सुलेमान बेकरी प्रकरणी निर्दोष ठरवलं होतं. या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टात अपील करण्यात आलं होतं. त्यावर निकाल देताना शुक्रवारी हायकोर्टाने सेशन कोर्टाचा निर्णय कायम ठेवला. मुंबईत 1992 साली जातीय दंगली उसळल्या होत्या. याच काळात महंमद अली रोड इथल्या सुलेमान बेकरीत काही संशयास्पद व्यक्ती लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तेव्हाचे सहपोलीस आयुक्त रामदेव त्यागी आणि त्यांच्या पथकानं सुलेमान बेकरीत घुसून गोळीबार केला होता. या गोळीबारात 9 निरपराध लोकांचा बळी गेला होता. याप्रकरणी पोलिसांवरही गुन्हा दाखल झाला होता. यात त्यागी यांच्यासह 17 जणांवर मुंबई सेशन कोर्टात केस चालली होती.

close