गोव्यात स्फोट : एकजण ठार

October 17, 2009 7:47 AM0 commentsViews:

17 ऑक्टोबर गोव्यात मडगावमध्ये स्कूटरच्या डिकीमध्ये शुक्रवारी रात्री स्फोट झाला. या स्फोटात एकजण ठार, तर दोनजण जखमी झालेत. स्फोट नक्की कशामुळे झाला हे अद्याप कळलेलं नाही. मात्र मालेगाव स्फोटातली आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरशी संबंधित सनातन संस्थेशी ठार झालेल्या व्यक्तीचा संबंध आहे का हे तपासून पाहिलं जात आहे. गोव्याचे गृहमंत्री रवी नाईक यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. कारण स्फोटात वापरण्यात आलेली स्कूटर सनातन संस्थेच्या निशाद बाकले या कार्यकर्त्याची असल्याचं समजतंय. गृहमंत्री रवी नायक आणि गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी घटनास्थळाला भेट दिली.

close