नेपाळला भूकंपाचा हादरा, उत्तरभारत दिल्लीही हादरली

April 25, 2015 12:57 PM0 commentsViews:

nepal earthquik25 एप्रिल : नेपाळ आणि उत्तर भारतात अतिशय मोठ्या स्वरूपाचा भूंकप झालाय. सकाळी 11 वाजून 56 मिनिटांनी हा भूकंप झालाय.
रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.6 इतकी आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू हा काठमांडूच्या उत्तर पश्चिम दिशेला 65 किलोमीटर लांब भूगर्भात 33 किलोमीटर खोलवर आहे. पहिल्या धक्क्यानंतर आणखी एक भूकंपाचा हादरा बसलाय. दुसर्‍या धक्का हा 6. 2 रिश्टर क्षमतेचा होता. नेपाळसह भारतात दिल्ली, सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंडला भूकंपाचे हादरे बसले.

नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये भूकंपाने मोठं नुकसान झालंय. भूकंपाच्या तीव्रतेनं रस्ते उखडले आहे. तर अनेक घरांची पडझड झाली असून काही जण जखमी झाल्याची माहिती समोर येतेय. भूकंपाच्या हादर्‍याने नागरिक भयभीत झाले असून घर,ऑफिस सोडून सर्वजण रस्त्यावर आणि मोकळ्या जागेचा आसरा घेतलाय. नेपाळच्या भूकंपाचे धक्के उत्तरभारतातही जाणवले. दिल्ली,नोयडामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्लीत भूकंपाची तीव्रता जास्त जाणवली. भूकंपामुळे तीन ते चार मिनिटांपर्यंत घरे आणि कार्यालयांचा परिसर हादरत होता. सुदैवाने अद्याप कुठेही जीवितहानी झाली नाही. राज्यात नागपूरमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूकंपग्रस्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केलीये. भूकंपामुळे नुकसानाची माहिती घेत असून तत्काळ मदत पोहचवली जाईल अशी माहिती त्यांनी टिवट्‌रवर दिलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close