तामिळनाडूत फटाक्यांच्या फॅक्टरीत स्फोट : 32 ठार

October 17, 2009 7:50 AM0 commentsViews: 1

17 ऑक्टोबर तामिळनाडूतल्या पल्लीपट्टू इथल्या फटाका फॅक्टरीत स्फोट होऊन 32 जण ठार झाले आहेत. त्यात 10 जण गंभीर जखमी आहेत. शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. पल्लीपट्टू इथल्या फटाका फॅक्टरीच्या गोडावूनमध्ये हा स्फोट झाला. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जळालेल्या गोडाऊनमध्ये शोधकार्य चालू आहे. आगीचं नक्की कारण समजू शकलेलं नाही. तिरुत्तनी इथल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये हे मृतदेह ठेवण्यात आले आहेत.

close