पुण्यात साखर परिषदेत पवार-गडकरी एकाच व्यासपीठावर

April 25, 2015 2:53 PM0 commentsViews:

pawar and gadkari4425 एप्रिल : पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्सस्टिट्यूटमध्ये साखर परिषदेच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे नेते नितीन गडकरी पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर आलेत.

साखर आयुक्तालय आणि राज्य साखर संघातर्फ या दोन दिवसीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या परिषदेला उपस्थित आहेत.

दरम्यान, या परिषदेला सरकारने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींना आमंत्रण दिलेलं नाही त्याबद्दल त्यांनी कालच जाहीरपणे नाराजी प्रगट केलीय. साखर उद्योगाचा पुढील 10 वर्षाचा रोडमॅप तयार करण्यासाठी ही परिषद बोलावण्यात आलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close