काठमांडूमध्ये वीना टूर्सचे महाराष्ट्रातील 28 पर्यटक सुखरूप

April 25, 2015 3:58 PM0 commentsViews:

nepalearthquake (23)25 एप्रिल : नेपाळ आणि उत्तर भारताला भूकंपाचा धक्का बसलाय. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.6 इतकी आहे. तर दुसरा धक्का हा 6.2 इतका होता. या भूकंपाने नेपाळमध्ये मोठं नुकसान झालंय. काठमांडूमध्ये पर्यटनासाठी महाराष्ट्रातील 28 पर्यटक गेले आहेत. सर्व पर्यटक सुखरूप असल्याचं सांगण्यात आलंय.

प्रसिद्ध वीणा वर्ल्ड टूर्सद्वारे महाराष्ट्रातील 28 पर्यटक काठमांडूमध्ये आहेत. यामध्ये मुंबई, पुणे नाशिक, डोंबिवलीचे पर्यटक आहे. पशुपतीनाथ मंदिराच्या दर्शनासाठी सर्व पर्यटक सध्या काठमांडूमध्ये आहेत. सकाळी भूकंपाचा धक्का आम्हाला जाणवला. त्यावेळी सर्व पर्यटकांना मोकळ्या मैदानात आणण्यात आलंय सर्व पर्यटक सुखरूप आहेत अशी माहिती वीणा वर्ल्ड टूरचे मॅनेजर सचिन भिसे यांनी दिली. भिसे यांनी भूकंपाची ‘आँखो देखे’ माहिती दिली. काठमांडूमध्ये जुन्या इमारती होत्या त्या जमीनदोस्त झाल्या आहे. नव्याने बांधकाम झालेल्या इमारतींना मात्र तडे गेले आहे. आम्ही ज्या एव्हरेस्ट हॉटेलमध्ये थांबलो होतो त्या इमारतीलाही तडे गेले आहे, त्यामुळे हॉटेलमधून आम्ही बाहेर पडलो असंही त्यांनी सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close