नेपाळमध्ये भूकंपातील बळींची संख्या 10 हजारांवर?

April 28, 2015 2:23 PM1 commentViews:

nepal 28 1

28 एप्रिल : नेपाळमधील भूकंपातील बळींची संख्या 10 हजारांवर जाण्याची भीती नेपाळच्या पंतप्रधान सुशील कोईराला यांनी रॉयटर्सशी बोलताना व्यक्त केली आहे. तसंच मदतकार्य अधिक वेगाने करण्याचे आदेशही त्यांनी दिली आहे. आतापर्यंत 5,057  जणांचा बळी गेला असून 8 हजार पेक्षा जास्त लोक यात जखमी झाले आहेत. नेपाळच्या भूकंपाला 72 तास उलटले असले तरी अजूनही अनेक लोक इमारतींच्या ढिगार्‍यांखाली अडकलेले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता ढिगार्‍या खाली अडकलेल्यांची सुटका करण्याचं धडपड सुरू आहे. दरम्यान काठमांडूमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बचावकार्यात पुन्हा एकादा अडथळा निर्माण झाला आहे.

नेपाळमधल्या बचावकार्यात सर्वात मोठा अडथळा आहे तो म्हणजे अख्खा देश हा डोंगराळ आहे. डोंगर, टेकड्या, दर्‍यांच्या कुशीत या देशाचं वास्तव्य आहे. त्यामुळे विमाने आणि हेलिकॉप्टरला पर्याय नाही. भारतीय वायूदलाने अनेक लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर्स नेपाळमध्ये पाठवली आहे. पण त्यातून गंभीर जखमींना प्राधान्य देऊन बेस कॅम्पवर आणलं जातं आहे. तिथून त्यांना जवळच्या रुग्णालयात नेलं जातं आहे.

दरम्यान, काठमांडूत अनेक ठिकाणी अन्न आणि औषधांचं वाटप सुरू आहे. विविध देशातून आलेली पथकं आणि सेवाभावी संस्था युद्ध पातळीवर स्थानिकांना मदत करत आहेत. काठमांडू वगळता अन्य भागांमध्ये जाण्यासाठी रस्ते सुस्थितीत नसल्याने तिथे वाहतूक कोंडी होत आहे. म्हणून तिथपर्यंत ही मदत सामुग्री घेऊन पोहचवणं कठीण झालं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Aakashhiwale

    हजारों फूल लगते हैं एक माला बनाने के लिए, हजारों दीप लगते हैं एक आरती सजाने के लिए, मगर एक “सद्गुरु” काफी हैं, ज़िन्दगी को जन्नत बनाने के लिए भावपूर्ण श्रद्धांजलि जय भारत मॉ.. शिवसेनेचे सर्व खासदार एक महिन्याचे मानधन भूकंपग्रस्तांना देणार, युवासेना प्रमुख श्री आदित्य साहेब ठाकरे यांची घोषणा, महाराष्ट्रातुन प्रथम मदत देणारा शिवसेना पक्ष या निर्णायाचे हार्दिक स्वागत, युवा सेना प्रमुख श्री आदित्य साहेब ठाकरे यांना मानाचा जय महाराष्ट्र.

close