भारत-ऑस्ट्रेलिया वन डे सीरिजचं वेळापत्रक

October 17, 2009 9:29 AM0 commentsViews: 12

17 ऑक्टोबर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सात वन डे मॅचची सीरिज होणार आहे. चॅम्पियन्स लीग टी-20 नंतर पुन्हा एकदा वन डे क्रिकेटची धूम सुरु होईल. या सीरिजचं वेळा पत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 25 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया आणि भारत दरम्यान पहिली वन डे होणार आहे. वडोदर्‍याच्या रिलायन्स स्टेडियमवर दुपारी 2.30 वाजता ही मॅच खेळवण्यात येईल. तर दुसरी मॅच 28 ऑक्टोबरला नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या ग्राऊंडवर रंगेल. तिसरी वन डे 31 ऑक्टोबरला दिल्लीच्या फिरोजशहा कोटला स्टेडियमवर होईल. चौथी वन डे 2 नोव्हेंबरला मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या ग्राऊंडवर रंगणार आहे. पाचवी आणी वन डे 5 नोव्हेंबरला हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर होईल. सहावी मॅच 8 नोव्हेंबरला गुवाहाटीच्या नेहरु स्टेडियमवर सकाळी 9 वाजता खेळवण्यात येईल. तर सातवी आणि शेवटची वन डे ही 11 नोव्हेंबरला मुंबईत ब्रेबॉन स्टेडियमवर होईल.

close