आसियान मध्ये भारत-चीन चर्चा

October 17, 2009 9:35 AM0 commentsViews: 1

17 ऑक्टोबर बँकॉकमधल्या आसियान शिखर परिषदेच्या निमित्ताने भारत आणि चीनमध्ये चर्चा होणार आहे. याबाबतचं नियोजन तयार होत असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. वेळापत्रक जुळल्यास पंतप्रधान मनमोहन सिंग आणि चीनचे पंतप्रधान वेन जियाबाओ यांच्यात चर्चा होणार आहे. या बैठकीत सीमावादाचा मुद्दा महत्त्वाचा असेल. त्याशिवाय तिबेटमध्ये ब्रम्हपुत्रा नदीवर चीनची धरण बांधण्याची योजना, पाकव्याप्त काश्मिरमधल्या अनेक प्रकल्पात चीनची गुंतवणूक, पाकिस्तानला चीनची लष्करी मदत हे मुद्दे भारत चीनसमोर उपस्थित करण्याची शक्यता आहे. तर सीमेवर भारत वाढवत असलेलं लष्करी सामर्थ्य तसंच चीनी कामगारांवर व्हिसाचे निर्बंध यासारख्या चीनच्या तक्रारी असतील.

close