एव्हरेस्टही हादरला, हिमकडा कोसळल्यामुळे 18 गिर्यारोहकांचा मृत्यू

April 25, 2015 8:50 PM0 commentsViews:

nepalavalanche25 एप्रिल : देवभूमी नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाने महाकाय एव्हरेस्ट शिखरही हादरलाय. भूकंपाने ग्रेट हिमालयी जोनमध्ये हाहाकार माजवलाय. भूकंपाच्या हादर्‍याने एव्हरेस्ट शिखराचा काही भाग कोसळला. हा हिमकडा दुर्देवाने एका गिर्यारोहकाच्या बेसकॅम्पवर कोसळल्यामुळे 18 जणांना मृत्यू झाला. भारतीय सैन्याने सर्व 18 जणांचे मृतदेह बाहेर काढले आहे. हे सर्व परदेशी गिर्यारोहक होते.

भूकंपामुळे माऊंट एव्हरेस्ट मोहिमेसाठी महत्वपूर्ण असे दोन बेसकॅम्प वाहून गेले आहे. अनेक गिर्यारोहक बेपत्ता झाले आहेत. हिमकडा कोसळल्यानंतर सर्व मोहिमा तूर्तास थांबवण्यात आलेल्या आहेत. 8848 मीटर उंच असलेल्या या शिखरावर अनेक मार्गात अडथळे निर्माण झाले आहे. गिर्यारोहकांचे अनेक दल अडकले आहे. बेसकॅम्प नेस्तनाबूत झाल्यामुळे खाण्या-पिण्याच्या वस्तूच्यांचा तुटवडा निर्माण झालाय. गिर्यारोहक दलांशीही संपर्क तुटलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close