नेपाळच्या मदतीसाठी भारताचं ‘ऑपरेशन मैत्री’ !

April 26, 2015 2:56 PM0 commentsViews:

opraion maitri26 एप्रिल : नेपाळला या नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मदतीचा हात पुढे करणारा भारत हा पहिला देश ठरला. या मदत मोहिमेला भारतानं ऑपरेशन मैत्री असं नाव दिलंय.

लष्कराची 10 आयएएफ (IAF) विमानं वैद्यकीय आणि बचाव साहित्य घेऊन निघाली आहेत. तर शनिवारपासूनच एनडीआरफची काही पथकं नेपाळमध्ये बचाव कामाला लागलीयेत. एअर इंडियोसबतच स्पाईस जेट आणि इंडिगो एअरलाईन्सनंही काठमांडूसाठी अतिरिक्त सेवा सुरू केलीये.

एअर इंडियाच्या विमानांमधून बचाव कार्यासाठीचं साहित्य नेण्याला प्राधान्य दिलं जातंय. तसंच भारतीय रेल्वेही या मदतकार्यात सहभागी झालीये. रेल्वेमार्फत 1 लाख पाण्याच्या बाटल्या नेपाळला पाठवण्यात आल्या आहेत. तर एअरटेल आणि BSNLने नेपाळसाठीच्या सर्व फोन कॉल दरांमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केलीये.

नेपाळला संकटातून बाहेर काढण्यासाठी

भारतानं नेपाळसाठी मदत पथकं पाठवली
– सुटकेसाठी हवाई दलाची 8 मिग 7 हेलिकॉप्टर्स
– त्याशिवाय 2 एएलएच ध्रुवसह आणखी 4 विमानं पाठवण्यात येणार आहेत
– पाणी, अन्न, एनडीआरएफची पथकं, वैद्यकीय पथकं,ब्लँकेट्स आणि तंबू पाठवण्यात आलीयेत.
– हॉस्पिटल्स आणि अभियांत्रिकी कामांसाठी लष्कराला घेऊन जाणारी 10 विमानं पाठवली जाणार आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close