नेपाळच्या जनतेचे अश्रू पुसणार, पंतप्रधानांनी दिला धीर

April 26, 2015 5:40 PM0 commentsViews:

modi man ki baat26 एप्रिल : आज ‘मन की बात’ या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात नेपाळसाठी दुख व्यक्त केलंय. आज खरं तर मन नाही करत काही बोलण्याचं असं सांगत पंतप्रधानांनी संवादाला सुरूवात केलीय. नेपाळला मदत तर पोहचवणारच पण तिथल्या जनतेचे अश्रू पुसणार आणि साथ देणार अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केलीय.

काही दिवसांपूर्वी गारपीटबद्दल शेतकर्‍यांशी संवाद साधला. बिहारमधील आपत्तीबद्दल बोलणं झालं आणि आता नेपाळमध्ये महाप्रलयकारी भूकंप आला. जणू निसर्गच आपल्यावर कोपलाय. नेपाळमध्ये काही भारतीयांचा मृत्यू झाला. 26 जानेवारी 2001 मध्ये कच्छमध्ये आलेल्या भूकंपाची या निमित्ताने आठवण झाली. नेपाळच्या जनतेवर दुखाचा डोंगर कोसळलाय. त्यांचं दुख मी समजू शकतो. पण, आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही सर्वपरीने मदत करण्यास सुरूवात केलीये. रेस्कू ऑपरेशन सुरू झालंय. ढिगाराखाली दबलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढणं हे पहिल कार्य आहे. तसंच तज्ज्ञ टीमही पाठवली असून स्निफर डॉग्सही पाठवले आहे. लोकांना सुखरूप आणि जिवंत वाचवणे हे मुख्य काम असणार आहे. त्यानंतर लोकांचं पुनर्वसन करावं लागणार आहे. या सगळ्या मोहिमेत नेपाळच्या जनतेचे अश्रू पुसणार आणि साथ देणार अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.

यमनमध्येही आमचे भारतीय अडकलेले होते. त्यावेळी गोळीबारातून भारतीयांना वाचवणे ही खूप मोठी गोष्ट होती. त्यावेळी एका चिमुरड्याला वाचवणेही खूप समाधानकारक होते. यमनमध्ये आम्ही 48 देशांच्या लोकांचे प्राण वाचवण्याचं कार्य केलं होतं. अमेरिकेपासून ते जपान पर्यंत सर्वच देशाने मदत केली होती ती खरंच वाखणण्या जोगी होती. आपल्या सैन्यानंही केलेल्या कामाचं खरंच कौतुक करण्या सारखं होतं असंही पंतप्रधान म्हणाले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close